ब्रेनडेड रुग्णाची किडनी पोहचली अवघ्या ३.५ तासात पुण्याहून नाशिकमध्ये
11 Jul, 2016

facebookTwitter LinkdinGoogle Plus

वॊक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ६ तासांच्या शस्रक्रियेनंतर झाले यशस्वी प्रत्यारोपणग्रीन क्यारेडोर साठी पुणे - नगर - नाशिक मध्ये प्रशासनाचे सहकार्य

नाशिक - अवयव प्रत्यारोपणसाठी उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम मान्यता मिळवलेल्या नाशिकच्या वॊक्हार्ट हॉस्पिटलमध्ये पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटल मधील ४६ वर्षीय ब्रेनडेड रुग्णाच्या किडनीचे नाशिक मधील ४१ वर्षीय रुग्णावर सफल प्रत्यारोपण करण्यात आले. अवयव प्रत्यारोपणाकरिता राज्य सरकारचा मान्यताप्राप्त विभाग काम करतो व तेथे प्रत्यारोपणाची गरज असणारे व प्रत्यारोपण करता येईल अश्याची नोंद होते.

पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये एका ब्रेनडेड रुग्णाची किडनी वॊक्हार्ट नाशिकच्या रुग्णासाठी उपलब्ध असल्याचे समजताच वॊक्हार्ट नाशिकची एक टीम त्वरित पुण्याला पोहचली काही चाचण्या केल्यानंतर ती किडनी ताब्यात घेतली. साधारणत: किडनी काढल्यानंतर सुमारे १८ ते २४ तासात त्याचे प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. त्यामुळे ती किडनी त्वरित नाशिकला पोहचणे शक्य व्हावे याकरिता पोलीस व प्रशासनास विनंती करण्यात आली. त्यास पुणे, नगर व नाशिक या तिनहि जिल्ह्यातील पोलीस व प्रशासनाने मोलाची मदत करून ती किडनी अवघ्या ३.५ तासात नाशिकला पोहचली. याप्रसंगी बोलतांना वॊक्हार्ट नाशिकचे केंद्रप्रमुख डॉ भरत शहा म्हणाले कि, वॊक्हार्ट नाशिक हे अवयव प्रत्यारोपणा बाबत परवानगी मिळालेले उत्तर महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल असून आजपर्यंत सुमारे २१ किडनी प्रत्यारोपण येथे झाले आहेत. पण हे २१ प्रत्यारोपण जिवंत नातेवाईकांनी किडनी दिल्यानंतर झाले. परंतु आज झालेले २२ वे प्रत्यारोपण हे ब्रेनडेड रुग्णाच्या किडनीने झाले आहे हे विशेष असेही ते म्हणाले.

वॊक्हार्टमध्ये किडनी प्रत्यारोपणाकरिता सुसज्ज विभाग कार्यरत असून आजतागायत जवळपास ६०,००० डायलिसीस यशस्वीरित्या करण्यात आले आहेत. नुकत्याच सी. एम. ओ. एशिया हेल्थकेअर अवार्डने उत्कृष्ट डायलिसीस सेवेकरिता नाशिकच्या वॊक्हार्टला गौरविण्यात आले होते. कोणत्याही प्रत्यारोपणासाठी डॉक्टर व सहकार्याच्या टीमची आवश्यकता असते पण या टीमचे समन्वय व नेफ्रोलोजीस्ट करत असतो. वॊक्हार्टमधील नेफ्रोलोजीस्ट डॉ नागेश अघोर म्हणाले कि, अवयव दानाबाबत समाजात जागृती होत असून वॊक्हार्टमध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे

Other News

News

 • Wockhardt Hospital Express Healthcare May 2019
  10 Jun, 2019
 • Increase in heart disease..
  18 Apr, 2019
 • A minimal Invasive surgery for mitral valve in heart was successfully performed
  04 Apr, 2019
 • Care Wins, Life Wins : Doctor creates controlled heart attack for good cause! : Wockhardt Hospital SOBO
  01 Mar, 2019
 • Care Wins, Life Wins : Rare case of Cortication of Aorta treated successfully : Wockhardt Hospital Nashik
  25 Jan, 2019
 • 82-year-old man first from Central India to get leadless pacemaker implanted
  27 Dec, 2018
 • Mumbai: Man has stroke, unlocked cell phone saves life
  10 Dec, 2018
 • No silicone implants in breasts, doctors tell Australia woman who underwent operation in Thailand
  10 Dec, 2018
 • Four critical patients get new lease of life
  10 Dec, 2018
 • 15 children undergo heart surgery at Wockhardt
  10 Dec, 2018